महाराष्ट्रात मुसळधार पाऊस: हवामान अलर्ट जारी, धरणं भरली
मुंबई, दि. 10 सप्टेंबर: महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
उत्तर महाराष्ट्र: उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा: मराठवाड्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ: विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात रिमझिम पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.
धरणं भरली
पावसाच्या संततधार सुरु असल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यातील अनेक धरणं काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटलाय.
काय घ्यावी काळजी?
शेतकरी: शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी.
नागरिक: नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी रहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
यात्रा: गणेशोत्सवाच्या यात्रांमध्ये सहभागी होणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
#महाराष्ट्र #पावस #हवामान #अलर्ट #धरण


thanks for comment.